Varas Nond Online: घरबसल्या करा वारसा नोंदणी, तलाठी कार्यालयात आता जाण्याची गरज नाही; पहा संपूर्ण प्रक्रिया

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Varas Nond Online: महाराष्ट्र राज्य सरकारने महसूल विभागाअंतर्गत काही महत्त्वाचा एक निर्णय काही दिवसांपूर्वी या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये वारसा नोंदणी आणि इतर काही असणारे कार्यालयीन कामकाज हे आता तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करता येणार आहे. राज्य सरकारी या घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे चांगला दिलासा हा या ठिकाणी मिळाला आहे. सध्या जर बघितलं तर बोजा दाखल करणे, वारसा नोंदणी करणे, बोजा कमी करणे, ई करार करणे, मयत झाले असलेल्या लोकांची नावे कमी करणे यांसारखे अनेक काही कारणासाठी आता तुम्हाला इतर महसूल असणाऱ्या कामाकरिता तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला सारख्या फेऱ्या ह्या माराव्या लागत असतात.

परंतु या कामांसाठी प्रचंड अशी गर्दी ही देखील तलाठी कार्यालयामध्ये होत असते. त्यामुळे त्याच अनुषंगाने नागरिकांची कामे हे देखील या ठिकाणी वेळेत होत नाहीत. बहुतांश असणाऱ्या नागरिकांना आपली नोंदणी ही करण्याकरिता सातत्याने सारखे तलाठी यांच्या कार्यालयामध्ये जावे लागत ते. आणि विशेष म्हणजे बहुतांश काही असणारे जिल्ह्यांमध्ये तलाठी यांच्याकडे दोन ते तीन या असणाऱ्या गावांचा कारभार हा यांच्याकडे दिला जातो. त्यामुळे देखील नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये प्रचंड हिंसांड होताना आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक हे देखील प्रचंड दिसून येते. या असणाऱ्या सर्व गोष्टीचा विचार करून या गोष्टींवर आळा एक प्रकारे बसवण्याकरिता राज्य शासनाने एक प्रकारचा महत्त्वपूर्ण असा निर्णय (Varas Nond Online) या ठिकाणी घेतलेला आहे.

यामध्ये ई हक्क प्रणाली याचा वापर हा केला जाणार

महसूल विभागाच्या कामकाजासाठी आता राज्य शासनाने ई हक्क प्रणालीचा वापर हा केला जाणार आहे. या पद्धतीचा वापर करून नागरिकांना आता बोजा दाखल करणे, वारसा नोंदणी करणे, बोजा कमी करणे, ई करार करणे, मयत झालेल्या लोकांचे असणारे नाव कमी करणे यांसारखे असंख्य असणारे कामांसाठी ही ई हक्क प्रणाली याचा वापर हा आता या ठिकाणी करता येणार आहे.

यासाठी नोंदणी कुठे करायची? Varas Nond Online

हे सर्व असणारे कामे करण्याकरिता आता महसूल विभागाच्या असणाऱ्या pdeigr.maharshtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागणार आहे. ही असणारी वेबसाईट शासनाची गेट प्रकारे अधिकृत अशी वेबसाईट आहे, याचा वापर हा करून नागरिक सर्व कामे या ठिकाणी करू शकणार आहेत.

आता आपल्या मोबाईल वरून पहा आपली एसटी बस कुठपर्यंत आली?

1 thought on “Varas Nond Online: घरबसल्या करा वारसा नोंदणी, तलाठी कार्यालयात आता जाण्याची गरज नाही; पहा संपूर्ण प्रक्रिया”

Leave a Comment