Gold Silver Rate Today 14 February व्हॅलेंटाईन डे रोजी सोने-चांदीला दरवाढीचे भरती, गिफ्टसाठी खाली करावा लागणार खिसा आजचे नवीन दर पहा..!

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

 

Gold Silver Rate Today 14 February 2025 : सोने आणि चांदीत सध्या डाबडुबलीचा खेळ सुरू आहे. सलग दर वाढल्यानंतर सोन्यात घसरण झाली. त्यानंतर वधारल्या किंमती. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्यागेल्या काही दिवसांत सोन्याच्या दणादण किंमती वधारल्या. किंमतीत तुफान आले आहे. सराफा बाजारात आता ग्राहक फिरकेनास झाला आहे. तर चांदीत गेल्या काही दिवसात उसळीनंतर मोठी शांतता दिसून येत आहे. किंमतीत मोठा बदल झालेला नाही. तर दुसरीकडे सोन्यात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. व्हॅलेंटाईन डे ला प्रियजनांना महागडे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आज सोने खरेदीसाठी अधिक पैसा मोजावा लागणार आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशा आहेत किंमती

 

सोन्याचा भाव वधारला

 

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी सोने 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी वधारले. तर बुधवारी 710 रुपयांनी सोन्याचा भाव गडगडला. तर गुरुवारी त्यात 400 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पांघरूण घेऊन झोपली

 

गेल्या 5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते 14 तारखेपर्यंत चांदीत कोणताही बदल झालेला नाही. किंमतीत मोठा बदल दिसलेला नाही. चांदीने लाखाच्या उंबरठ्यावर मुक्काम ठोकला आहे. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,748, 23 कॅरेट 85,405, 22 कॅरेट सोने 78,545 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,311 रुपये, 14 कॅरेट सोने 50,163 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,549 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहर आजचा दर
मुंबई 79,900 रुपये
पुणे 79,900 रुपये
नागपूर 79,900 रुपये
कोल्हापूर 79,900 रुपये
जळगाव 79,900 रुपये
ठाणे 79,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहर आजचा दर
मुंबई 87,160 रुपये
पुणे 87,160 रुपये
नागपूर 87,160 रुपये
कोल्हापूर 87,160 रुपये
जळगाव 87,160 रुपये
ठाणे 87,160 रुपये

 

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमतीजाहीर करण्यात येतात. ग्राहक

 

Leave a Comment