E Pik Pahani राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याला डिजिटल शेतीसाठी अधिक चालना देण्याकरिता ई-पीक पाहणी हा एक प्रकल्प शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांसाठी सुरू केलेला आहे. तर आता रब्बी हंगामा करिता या असणाऱ्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपापल्या पिकांची नोंदणी करणे हे आता फार सुलभ आणि एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये रब्बी हंगाम याची पीक पाहणी (E Pik Pahani) डिजिटल सर्वे या असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक ॲपचा देखील या ठिकाणी उपयोग हा करण्यात येत आहे.
या ई-पीक पाहणी मुळे यावे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकांची डिजिटल नोंदणी ही करण्यासाठी अधिक सोपी झाली आहे. यामध्ये 50 मीटर च्या आत मध्ये फोटो हा शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे. आणि सातबारा उतारावरील अचूक नोंदणी याची देखील फायदे हे जाणून घ्या.
E Pik Pahani: शेतकऱ्यांनी ही पीक नोंदणी कशा पद्धतीने करावी?
शेतकरी वर्गांनी त्यांच्या गट क्रमांक जवळीत 50 मीटरच्या आत मध्ये त्यांच्या पिकांचा फोटो हा या ठिकाणी काढावा लागतात. आणि या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी एक डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी मुदत देखील दिली जाते.
सातबारा उतारा या करता ई-पीक पाहणी
तर यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पिकांची नोंदणी करण्याकरिता सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणी या ॲपचा उपयोग हा होतो. परंतु आता केंद्र शासनाने डिजिटल क्रॉप सर्वे या असणाऱ्या ॲपचा काही निवडक अशा तालुका मध्ये याचा उपयोग हा झालेला होता.
खरीप हंगामामध्ये राज्यभरामध्ये चांगलाच वापर होणार होता. मात्र फक्त 34 तालुक्यांमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काही गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे होता. आणि यावेळी पीक पाहण्याची जबाबदारी ही ग्राम स्तरावरील कर्मचारी यांनी चांगली सांभाळली.
यंदा या रब्बी हंगामामध्ये ही ई-पीक पाहणी एक डिसेंबर पासूनच सुरूही झालेली आहे. आणि यासाठी 45 दिवसाची मुदत ही शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली आहे. आणि त्यानंतर सहाय्यक या नोंदणीसाठी पुढाकार घेतील.
आत्ताच सीमेच्या 50 मीटर याची छायाचित्र हे अनिवार्य
- या अगोदर पूर्वी फोटो काढण्याचा नियम हा शेती गटाच्या मध्यबिंदूपासून होता.
- मात्र आता तो नियम बदलून सीमेपासून 50 मीटरच्या आत मध्ये हे छायाचित्र घेणे आता बंधनकारक आहे.
- आणि यामुळे 100% पिकांच्या छायाचित्राची पूर्तता ही या ठिकाणी होईल, असा देखील नियम हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
सहाय्यकाची यामधील जबाबदारी
शेतकऱ्यांना या पिकांची नोंदणी करत असताना येणाऱ्या अडचणी याला सहाय्यक हे मदत करतील. तसेच ज्या भागाची नोंदणी ही झालेली नाही अशा भागांची पीक पाहणी हे सहाय्यक या ठिकाणी पूर्ण करतील, असे राज्याचे राज्य समन्वयक म्हणजेच सरिता नरके यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी ही सुटसुटीत मार्गाने आणि अधिक स्पष्ट ही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांकरिता एक सुलभ प्रक्रिया आणि आधुनिक अशी प्रक्रिया आहे. या असणाऱ्या डिजिटल पद्धतीमुळे अधिक प्रकारे पारदर्शकता आणि सुटसुटीत शेती व्यवस्थापन हे चांगले झाले आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ हा वेळेत घेऊन ही नोंदणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करावी.
2 thoughts on “E Pik Pahani: ई-पीक पाहणीसाठी ही आली नवीन अट, पहा लगेच येथे माहिती!”